एजंट पासून सुटका : घरी बसून ३५२७ जणांनी मिळवला वाहन परवाना….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शिकाऊ वाहन परवान्याची परीक्षा घरबसल्याही देता यावी यासाठी परिवहन विभागाने सोमवारपासून नवीन सुविधा सुरू केली.

यात मंगळवारी राज्यात ३,५२७ जण शिकाऊ वाहन परवाना परीक्षा घरबसल्या पास झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. घरबसल्या परीक्षा देऊन पास होणाऱ्यांच्या संख्येत पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर येथील परीक्षार्थीचा समावेश आहे.

शिकाऊ लायसन्सची परीक्षा देण्यासाठी अनेकांना आरटीओत जावे लागते. परीक्षेसाठी वेळ घेण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो.

यातून सुटका करण्यासाठी परिवहन विभागाने घरबसल्या परीक्षा देण्याची संकल्पना सोमवारपासूून अमलात आणली. यात परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. त्यासाठी आधार क्रमांक जोडावा लागतो.

पुण्यात सर्वाधिक परीक्षार्थी:- पुणे आरटीओअंतर्गत ३०७ परीक्षार्थी होते. तर नाशिक आरटीओंतर्गत २२२ जण असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील ताडदेव आरटीओंतर्गत १९१ जणांची नोंद झाली असून अंधेरी आरटीओत १४२, वडाळा आरटीओत १६० आणि ठाणे आरटीओत १७५ जणांनी परीक्षा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe