खोटे उत्सव व पोकळ भाषण नव्हे, तर देशाला तोडगा द्या : राहुल गांधी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे.

खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या, असे िट्वट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

कोरोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर टीका केली आहे.

केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे अाहे. धोरणात दुर्बल घटकांसाठी लसीची हमी देण्यात आलेली नाही,.

दुर्बल घटकांना लसीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही.

केंद्र सरकारची कोविड रणनीती स्टेज १ तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर गांधी यांनी टीका केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe