अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्त्यांवर राहतात. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
बुधवारी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले,
आमदार काळे, संग्राम जगताप व डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती,
उपसचिव व्ही. एफ. वसावे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने आदी यावेळी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved