अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- लहान मुलांसाठी नेझल स्प्रे स्वरूपात कोरोना लस तयार करण्यात आली आहे. रशियामध्ये तयार केली असून ती सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
ही कोणती नवी लस नाही तर सध्या भारतात परवानगी मिळालेली रशियाची स्पुतनिक V लसच आहे. जी रशियाच्या गॅमेलिया इन्स्टिट्यूने तयार केली आहे.
TASS न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार गॅमेलिया इन्स्टिट्यूचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे.
ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल. 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या वयोगटातील मुलांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसला नाही.
त्यांच्या शरीराचं तापमानही वाढलं नाही, असं गिंट्सबर्ग यांनी सांगितलं. पण किती मुलांवर ही चाचणी घेण्यात आली हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम