अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील लसीकरण गावागावात जाऊन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सुचना तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना आज राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.
राहुरी तालुक्यात लसीकरणाच्या नियोजनाबाबत मंत्री तनपुरे यांनी आज सकाळी तहसीलदार शेख, गटविकास अधिकारी खामकर आदीं अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
त्यात लसीकरण नियोजनाबाबत अंतिम आराखडा तयार करून येणारा लसीचा पुढचा डोस हा आता गावात जाऊन द्या, अशी सुचना ना. तनपुरे यांनी केली.
तसेच, गावागावात लस देताना गावातील वयस्कर ग्रामस्थ्यांना प्राधान्य देण्याची सुचनाही त्यांनी आवर्जून केली.
यावेळी काटेकोर नियोजन करून अजिबात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. त्यामुळे आता पुढील डोस गावातच मिळून जेष्ठांना प्राधान्य मिळणार असल्याने ना.तनपुरे यांच्या निर्णयाचे व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांचे आभार मानले जात आहेत
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|