Goa Elections Result : गोव्याचे मुख्यमंत्री काठावर पास; फक्त ‘इतक्या’ मतांनी आले निवडून

Published on -

गोवा : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारली आहे. पंजाब सोडून भाजपने सर्व राज्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

गोव्यामध्ये (GOA) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत होती. हे पहिल्यापासूनच पाहायला मिळाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती.

भाजपने आघाडी घेतली असली तरी काँग्रेसने मात्र मोठी झुंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत मात्र त्यांना हा विजय सहज मिळालेला नाही.

साखळी मतदारसंघातून प्रमोद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांना पराभवाची धूळ चारली आहे. प्रमोद सावंत यांना काठावर पस मते मिळाली असल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे अवघे ४०० मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची पनीवडूं येण्यासाठी पुरती दमछाक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अटीतटीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

प्रमोद सावंत हे सतत पिछाडीवर जात होते. साखळी मतदार संघातून प्रमोद सावंत हे शेवटच्या राऊंडला पिछाडी वर पडले होते. मात्र पुन्हा एकदा मुसंडी मारत प्रमोद सावंत निवडून आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News