विखेंच्या बालेकिल्ल्यात जात तांबें आखतायत राजकीय खेळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शिर्डी मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाविषयी लोकांच्या मनात राग आहे. मात्र, कुणाच्या भरवशावर विरोध करायचा, अशी त्यांची आजवर भावना होती.

त्यासाठी आता आम्ही यंत्रणा उभी केली आहे. राहात्यात विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही, तसेच शिर्डी नगरपंचायतीत विखेंना आजवर काठावरचीच सत्ता मिळत आली,

‘ अशी टीका युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे. दरम्यान शनिवारी तांबे यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन,

राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा शंख फुंकला. त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तिथे त्यांनी विखे पाटलांवर टीकेची झोड उठवली.

‘आगामी शिर्डी नगरपंचायत व राहाता नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. लोकांच्या प्रश्नांवर आंदोलने करा,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

बैठकीपूर्वी शिर्डी येथील शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेचा उल्लेख त्यांनी बैठकीत केला. तांबे म्हणाले,

राहात्यातील विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही. डॉ. राजेंद्र पिपाडा यांची ओळख विखे विरोधक, अशी होती. त्यांनी विखे यांना शरण जाणे लोकांना आवडलेले नाही.’

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe