सोने आणि चांदी दरात आजही घसरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने आणि चांदी दरात आजही घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 87 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीचा दर हा 274 रुपयांनी कमी झालं आहे. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याची किंमत 47225 रुपये प्रती दहा ग्रॅम आहे.

दरम्यान त्यानंतर सोन्याचा दर मंगळवारी शनिवारी 47,312 रुपये प्रती दहा ग्रॅम झालं आहे. इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, 23 जून 2021 रोजी देशभर सराफा बाजारात सोने-चांदीचे दर असे आहेत.

24 कॅरेट सोन्याचा दर 47225 रुपये तर 23 कॅरेट सोन्याचा दर 47036 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 43258 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 35419 रुपये आहे.

तर 14 कॅरेट सोन्याचा दर हा 27627 रुपये आहे. सिल्व्हर 67924 रुपये असा आहे. इंडियन बुलियन एँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे हे रेट जाहीर केले आहेत. तसेचं आपल्या शहरात 500 ते 1000 रुपयांच्या जवळपास बदल होऊ शकतात.

IBJA द्वारे जाहिर करण्यात आलेले दर देशभरात सर्वसाधारपणे सारखेच असतात. महत्वाचं म्हणजे या दरात जीएसटी नाही. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचा दर 0.40 टक्क्यांनी वाढला होता.

मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर मंगळवारीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe