अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६,३१० च्या उच्चांकावर पोहोचले होते, पण त्यानंतर मात्र यात सातत्याने घसरण होत आहे.
सध्या सोन्याची किंमत ४५ हजाराच्या आसपास पोहचली आहे. चांदीच्या किंमतीतही साधारण १० हजार रुपयांची घट झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपये इतका झाला आहे. गोल्ड रिर्टन या वेबसाईटच्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ४४,००० रुपयांपर्यंत पोहचला असून २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना ४३,००० रुपये मोजावे लागणार आहेत.
शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात १६० रुपयांची घसरण झाली आहे. तर दिल्ली शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,०५० रुपये आहे तर २२ कॅरेट सोने ४४,०५० रुपयांवर पोहचले आहे.
चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा दर ४६,१७० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४२,३२० रुपयांवर पोहचला आहे. तर कोलकोतामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,९०० रुपये झाला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४४,१८० रुपये झाला आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याची किंमत सध्या ४४ हजार ते ४५ हजाराच्या घरात आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरी सोने ४५ रुपयांच्या घटीसह ४४,६५० वर बंद झाला.
पण लवकरच सोने ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर जाणार आहे. पुढच्या दोन महिन्यात सोन्याची किंमत ४८ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याचप्रकारे या दोन महिन्यात चांदीचीही किंमत वाढण्याची शक्यता आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|