सोन्याचा भाव वधारला; जाणून घ्या दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या दराचा स्थानिक बाजारातही परिणाम दिसून आलाय.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा आणि कोरोना साथीच्या वाढत्या प्रकरणांमुळे सोन्याला आधार मिळाला आहे .

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढला. सोन्याप्रमाणे चांदीचा भावही वाढला.

एक किलो चांदीची किंमत 62 रुपयांनी वाढली. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढून 45,049 रुपये झाला. गेल्या व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 44,966 रुपयांवर बंद झाला होता.

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 62 रुपयांनी वाढून 64,650 रुपये झाली. मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव 64,588 रुपये प्रतिकिलो होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe