Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. किलोमागे चांदीचा भाव (Silver Rate) हा 561 रुपयांनी वाढला आहे.
10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Rate) आज 51,958 रुपयांवर उघडला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीदारांना (Gold and silver buyers) मोठा झटका बसला आहे.

ही आहे 24 कॅरेट सोन्याची किंमत
आज 24 कॅरेट सोन्याचा (24 carat gold) 10 ग्रॅमचा भाव 51,958 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्यात 328 रुपयांची वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याचा आज सरासरी भाव 51,750 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 47,594 रुपये आहे. 14 कॅरेटची किंमत 30,3965 रुपये होती. IBJA च्या (IBJA) वेबसाइटवर ही सोन्याची किंमत आहे..
IBJA वर दर (संध्याकाळचा दर)
धातू | 25 ऑगस्टचा दर (रु. / 10 ग्रॅम) | 24 ऑगस्टचा दर (रु./10 ग्रॅम) | दर बदल (रु./10 ग्रॅम) |
सोने 999 (24 कॅरेट) | 51958 | 51630 | 328 |
सोने 995 (23 कॅरेट) | 51750 | 51423 | 327 |
सोने 916 (22 कॅरेट) | 47594 | 47293 | 301 |
सोने 750 (18 कॅरेट) | 38969 | 38723 | 246 |
सोने 585 (14 कॅरेट) | 30395 | 30204 | 191 |
चांदी 999 | 55785 रु/किलो | 55224 रु/किलो | 561 रु/किलो |
या श्रेणीत सोन्याची खरेदी-विक्री करता येते
ओरिगो ई मंडीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तरुण तत्सांगी यांच्या मते, सोन्याचा भाव लवकरच 52,600 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो.
तथापि, दुसरीकडे, 50,980 रुपयांच्या खाली घसरल्याने सोने मध्यम कालावधीत मंदीचा कल बनवेल. 50,980 रुपयांच्या खाली घसरल्यानंतर, मध्यम कालावधीत सोन्याचा भाव पुन्हा एकदा 49,500 ते 49,700 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.