सोने- चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम ४९,००० रुपयांच्या जवळ पोहोचले.

त्याचबरोबर चांदीची किंमत देखील आज प्रचंड वाढली आहे. सोन्याचा दर ३८० रुपयांनी वाढला तर चांदी तब्बल १२०० रुपयांची महागली आहे.

त्यामुळे सोन्यापेक्षा आता चांदीला अच्छे दिन आले आहे. एक किलो चांदीचा दर हा ७३००० रुपयांवर पोहचला आहे.

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४९ हजार ६७० वर पोहचला आहे. त्यामुळे सोन्याचा दरात ३८० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी सोन्याचा दर ४९७२१ या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. तर एक किलो चांदी ७३ हजार ०६६ रुपये झाली होती.

त्यात आता चांदीच्या दरातही ११६७ रुपयेही विक्रमी वाढ नोंदवण्यात आल्यामुळे चांदीने ७३१०० रुपयांचा पल्ला गाठला आहे.

डॉलरची घसरण आणि महागाई वाढण्याची शक्यता याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे सोन्यानं गेल्या ५ महिन्यांतील उच्चांकी दर गाठला आहे.

कोरोना संकट कायम असल्यानं लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. सोन्यातील गुंतवणूक पारंपरिक स्वरुपाची मानली जाते. भारतीय गुंतवणूकदार याकडे सुरक्षित गुंतवणूक पाहतात.

कोरोनाचं संकट कायम असल्यानं सोन्याकडे असलेला ओढा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याचे दर वाढू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe