अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यातील सराफ सुवर्णकार व्यावसायिक हा कायम सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागे उभा असतो. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले आहे.
त्यामुळे हातावर पोट असलेले सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आपल्या अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडेल म्हणून नागरिकांनी थोडेफार सोनं जमा करून ठेवले आहे.
मात्र लॉकडाऊन मुळे सर्व सराफ सुवर्णकारांची दुकाने बंद असल्याने संकटात सापडलेल्या नागरिकांना जवळ असलेले सोनं विकता येत नाहीये. गोरगरीब नागरिकांना अडीअडचणीच्या काळात फक्त सोनारच मदतीला येत असतो.
सर्वसामान्यांना गरज पडेल तेव्हा सोनार वित्तीय पुरवठा करत आहे. तसेच राज्य सरकारने आता लग्न समारंभांना परवानगी दिलेली आहे. मात्र मंगळसूत्र व जोडव्यां शिवाय लग्नच होवू शकत नाही.
त्यामुळेही नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी राज्यातील सर्व सोनार व्यावसायिकांना इतर खाजगी वित्तीय संस्थांप्रमाणे दिवसातील किमान तीन तास आपली दुकाने उघडण्याची परवांगी राज्य सरकारने त्वरित द्यावी,
भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे. सराफ व्यापारी संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
लॉकडाऊन मुळे सर्व प्रमुख बाजारपेठा बंद आहेत. मात्र या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत काहीप्रमाणात विसंगती आहे. आर्थिक सेवा देणाऱ्या बँकांना लॉकडाऊन मधुन सूट देण्यात आली आहे.
मात्र मुत्थुत व श्रीराम फायनान्स सारख्या खाजगी वित्तीय संस्थांनाही परवानगी देण्यात आली असल्याने त्याठिकाणा हून मोठ्याप्रमाणात सोने खरेदी विक्रीचे व्यवहार केला जात आहे. सराफ व्यावसायिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत लॉकडाऊनला कधीही विरोध केला नाहीये.
खाजगी वित्तीय संस्था चालू व आमचा व्यवसाय बंद असा भेदभाव का ? त्यामुळे राज्य सरकाने गांभीर्याने विचार करून राज्यातील सराफ सुवर्णकारांची दुकाने उघडण्याची त्वरित परवांगी द्यावी.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|