अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात दरदिवशी बाधितांची आकडेवारी मध्ये मोठी वाढ होत आहे.
यातच नागरिकांच्या रक्षणासाठी 24 तास सज्ज असलेले पोलीस कर्मचारी यांना देखील या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या.
मात्र नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी व त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या खाकीलाच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घना नगरमध्ये घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दौंड येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यास करोना संसर्ग झाल्याने 28 एप्रिलला नगर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
दुसर्या दिवशी त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडली. शुक्रवारी पहाटे 5 वाजता हाॅस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांना हाॅस्पिटलकडून सांगण्यात आले.
आमच्याकडे ऑक्सिजन संपल्याने तुम्ही ऑक्सिजन घेऊन या, असे नातेवाईकांना सांगितल्याने नातेवाईक सिलेंडर घेऊन प्लॅटवर ऑक्सिजन आणल्यासाठी गेले.
तेथे गेल्यावर कळाले की, संबंधीत हॉस्पिटलच्या नावाने त्या प्लॅटवर 13 सिलेंटर भरलेले होते. परंतू, हॉस्पिटलचा प्राधिकृत व्यक्ती ते आणायला गेले नाही.
वेळेत ऑक्सिजन न मिळल्याने मृत्यू झाल्याने संबधीत हॉस्पिटलवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनास्थळी तोफखाना पोलिसांनी भेट देत घटनेची माहिती घेतली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|