अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- जून महिना यंपला मात्र अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र जामखेड तालुक्यातील खर्ड्याजवळील सोनेगाव परिसरात ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांनी या परिसराला धावती भेट देऊन प्रशासनाने पंचनामे करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.
या बाबत माहिती अशी की, काल दुपारी तालुक्यातील सोनेगाव, वाकी, दौडाचीवाडी, धनेगाव या गावाच्या परिसरात सुमारे दोन तास जोरदार मुसळधार पाऊस पडला. गेल्या ४० वर्षात एवढा मोठा एकाच वेळी पडला नसल्याचे येथील जुन्या जानकार शेतकऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे ढगफुटीच झाल्याचे अनेकांनी सांगितले. यामध्ये शेतकऱ्यांच्या नव्या विहिरीवरील सिमेंटचे बांधकाम, रानातली माती, कडब्याच्या गंजी वाहून गेल्या आहेत तसेच खरिपाचे उगवून आलेले उडीद, सोयाबीन,
तूर,कांदा, पालेभाज्या, केळी, लिंबाच्या बागा व मूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतातील ठिबक सिंचन, स्पिंकलर या वस्तूही वाहून गेल्याने जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम