अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्व निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान आज दोन जोडप्यांनी पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्येच लग्न केले आहे.
लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड सेंटरला मदत केली आहे. पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी भव्य कोविड सेंटर उभारले आहे. कोविडच्या संकटात हजारो नागरिकांच्या मदतीला आमदार निलेश लंके स्वत: धावून जात आहेत.
त्यामुळेच, राज्यात लंकेंनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा आणि कौतुक झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, आता लंकेंचं हे कोविड सेंटरमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यामुळे ते सध्या चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे.
अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे तसेच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात कोविड सेंटरममधून केली आहे. विवाह म्हटलं तर मोठा खर्च हा येतोच.
या अवांतर खर्चाला आळा घालून ती रक्कम कोरोना रुग्णांच्या कामी यावी या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही नव वधू-वरांनी संपूर्ण रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, अत्यावश्यक औषधे या सेंटरला दिले आहे.
इतकेच नाही तर ३७००० रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे. कोरोना रुग्णांना आपले नातेवाईक, हितचिंतक, वऱ्हाडी आहे, असे समजून भोजनही दिले. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कोविड सेंटरमधील या विवाहावरुन काहींनी निलेश लंकेंना ट्रोल केलं आहे, तर अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. मात्र, अद्यापही कोरोनाचं संकट असताना असा विवाह कितपत योग्य, हाही मुख्य प्रश्न आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम