हमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देशभरात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पूतनिक या कंपनीच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता देशात आणखी एक लस लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या लसीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे.
तसेच ऑगस्टपासून ही लस मुलांना देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जायडस कॅडिलाच्या चाचण्या पूर्ण होत आल्या आहेत.
त्यामुळे लवकरच ही लस उपलब्ध होणार असून जुलै अखेरीस किंवा ऑगस्टपासून ही लस 12 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यात येण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.
जायडस कॅडिलाच्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आल्यास ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लस उपलब्ध होऊ शकेल आणि लसीकरणाला गती देता येणार आहे.
आयसीएमआरच्या अभ्यासानुसार तिसरी लाट येण्यास अजून काही महिने आहेत. त्यामुळे आगामी काळात लसीकरण वाढवण्यावर भर देणार असल्याचे अरोडा यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम