अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा करण्यात येत आहे.
१ मे पासून राज्यांना थेट पुरवठा सुरू झाल्याची माहिती भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी सोमवारी दिली.

file photo
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार कोव्हॅक्सिनचा राज्यांना थेट पुरवठा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्यांकडून देखील लसी पुरवठ्याची विनंती करण्यात आली आहे.
आम्ही साठ्याच्या उपलब्धतेच्या आधारावर वितरण करू, असे भारत बायोटेककडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीकडून सध्या महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, आसाम, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालला कोव्हॅक्सिन पुरवण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|