Axis Bank FD Interest Rates : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने काही कालावधीच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळविण्याची संधी मिळाली आहे.
बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी FD व्याजदरात 10 bps वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 17 जुलै 2023 पासून लागू झाले आहेत. Axis Bank 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.5% ते 7.20% दरम्यान व्याजदर देते.

नवीनतम Axis Bank FD व्याजदर
Axis बँकेच्या म्हणण्यानुसार, 7 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 3.50% व्याजदर दिला जात आहे. तर, 46 ते 60 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD साठी व्याजदर 4.00% आहे. Axis Bank 61 दिवस ते तीन महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 4.50% व्याज दर देत आहे. त्याचप्रमाणे 3 महिने ते सहा महिन्यांच्या ठेवींवर 4.75% व्याजदर दिला जात आहे. त्याच वेळी, 6 ते 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.75% व्याजदर दिला जात आहे. 9 महिने ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणार्या FD वर 6.00% व्याज दिले जाईल.
बँकेने एक वर्ष किंवा एक वर्ष आणि चार दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD साठी 6.75% आणि एक वर्ष 5 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD साठी 6.80% व्याजदर देऊ केला आहे. बँक 13 महिने आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10 टक्के व्याज देते. तथापि, बँकेने आता 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 10 bps ने वाढवून 7.20% केला आहे, जो बँकेने देऊ केलेला सर्वोच्च व्याज दर आहे. त्याच वेळी, Axis बँक 2 वर्ष ते 30 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.05% ऑफर करत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी Axis बँकेचे व्याजदर
Axis बँकेच्या म्हणण्यानुसार, 3.50% ते 7.95% मधील व्याज दर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वाधिक 7.95% व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आली आहे.