शेतकऱ्यांसाठी खुशखबर : नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू

Ahmednagarlive24
Published:
Chana Procurement

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथे हरभरा खरेदी केंद्र चालू झाले असल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी दिली आहे.

सन २०२०-२१ या वर्षामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी केंद्र कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे नेप्ती उपबाजार आवार या ठिकाणी चालू झाले आहे.शासनाने सदर कडधान्य खरेदीचे दर जाहीर केले आहे .

त्यानुसार हरभरा या शेतमालास प्रति क्विंटलसाठी रुपये ५१०० या प्रमाणे बाजारभाव निचित केलेला आहे. तरी शेतक­यांनी शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच शेतक­यांनी आपला शेतमाल (हरभरा ) वाळवून स्वच्छ करुन व १२ टक्के अद्रता असलेले आणावा.

निकृष्ट दर्जाचा शेतमाल स्वीकारला जाणार नाही याची सर्व शेतक­यांनी नोंद घ्यावी. सदरचे शेतक­यांचे शेतीमालाची नोंदणी प्रक्रिया व दि. १ मार्च पासून हरभरा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे उपबाजार नेप्ती येथील खरेदी केंद्रावर सुरु झाली आहे.

शेतक­यांनी हरभरा या पिकाची ऑनलाईन नोंद असलेला ओरिजनल 7/12 व 8 अ, आधार कार्ड झेरॉक्स तसेच आधारकार्डशी सलग्न असलेल्या नॅानलाईज बँकेची पासबूक झेरॉक्स ती खाते नंबर व आय.एफ.सी कोड ठळक नोंद असलेले आवयक आहे. त्याचप्रमाणे जनधन खाते स्वीकारले जाणार नाही.

शेतमाल आणण्यासाठी एस.एम.एस. द्वारे कळविण्यांत येईल.असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe