अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोविड -19 साथीच्या दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नॉन-ब्रँच शाखांसाठी रोख पैसे काढण्याची मर्यादा तात्पुरती वाढविली आहे.
याशिवाय बँकेने शाखांमध्ये नॉन-होम थर्ड पार्टी रोख रक्कम काढण्यासही मान्यता दिली आहे. यामुळे अशा ग्राहकांना दिलासा मिळेल, जे कोणत्याही कारणास्तव रोख रक्कम काढण्यासाठी त्यांच्या गृह शाखेत जाऊ शकत नाहीत.

ग्राहक त्यांच्या इमर्जन्सी लागणारी पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत जाणे टाळतील आणि त्यांची गरजही पूर्ण होईल. एसबीआयने नॉन-होम शाखेतून रोख पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे ती 50,000 रुपयांवरून एक लाखांपर्यंत केली आहे.
आतापर्यंत 50 हजार रुपयांची मर्यादा होती :- यापूर्वी एसबीआय ग्राहक धनादेशाद्वारे नॉन-होम ब्रांचमधून फक्त 50 हजार रुपये काढू शकत होते.
आता ही मर्यादा दुप्पट करून 1 लाख रुपये केली आहे. याशिवाय बचत खात्याच्या पासबुकद्वारे पैसे काढण्याचे फॉर्म भरून आपण 25000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. आतापर्यंतची मर्यादा फक्त 5000 रुपये होती.
कधीपर्यंत मिळेल सवलत ? :- ‘पर्सनल’ कॅटेगिरीमधील ग्राहक 30-सप्टेंबर 2021 पर्यंत नॉन-होम व्यवहार लिमिटमध्ये या अपडेटचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, एसबीआयने रोख रक्कम काढणे आणि चेक बुक फी वाढविली आहे.
एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांवर 1 जुलै 2021 पासून नवीन सेवा शुल्क लागू करेल. 1 जुलैपासून एटीएममधून रोकड काढण्यासाठी, चेक बुक, हस्तांतरण आणि इतर बिगर आर्थिक व्यवहारांवर नवीन शुल्क आकारले जाईल.
जाणून घ्या नवीन चार्जेस :-
एसबीआय शाखेत रोख पैसे काढणे :- चार मोफत रोख पैसे काढल्यानंतर बँक शुल्क आकारेल, ज्यामध्ये शाखा आणि एटीएम या दोन्हीठिकाणी शुल्क आकारले जाईल.
दुसऱ्या शब्दांत, बँकेच्या बीएसबीडी खातेधारकास एका महिन्यात चारपेक्षा जास्त विनामूल्य रोख पैसे काढण्यासाठी सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. ग्राहकांना प्रत्येक रोख रक्कम काढण्याच्या व्यवहारासाठी शाखा किंवा एटीएमवर 15 रुपये अधिक जीएसटी असा चार्ज द्यावे लागतील.
एसबीआय एटीएममध्ये कॅश काढणे :- एसबीआयने म्हटले आहे की चार मोफत रोख रक्कम काढल्यानंतर सर्व एटीएम व शाखांमध्ये सेवा शुल्क घेण्यात येईल. चार विनामूल्य पैसे काढल्यानंतर सर्व एसबीआय आणि एसबीआय नसलेल्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी 15 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल.
चेकबुक चार्ज :- एसबीआय आर्थिक वर्षात बीएसबीडी खातेदारांना 10 चेक लीफ विनाशुल्क देईल. त्यानंतर 10 लीफ चेक बुकसाठी 40 रुपये अधिक जीएसटी असा चार्ज आकारला जाईल. 25 लीफ चेकबुकसाठी 75 रुपये प्लस जीएसटी चार्ज आकारला जाईल.
10 लीफच्या इमरजेंसी चेक बुकसाठी 50 रुपये प्लस जीएसटी द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एसबीआय आणि बिगर एसबीआय शाखांमध्ये बीएसबीडी खातेदारांना गैर-आर्थिक व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम