अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- भंडारदरा व कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात पर्यटनबंदीमुळे व्यावसायिकांची उपासमार सुरू होती.
पर्यटकांची तसेच स्थानिक व्यावसायिकांची मागणी विचारत घेऊन महसूल, पोलीस वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन पर्यटन खुले केल्याने आता पर्यटकांना पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
या अभयारण्य क्षेत्रात शनिवार व रविवार पर्यटन बंद केल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या होत्या.
कोलटेंभे, मुतखेल, रतनवाडी, सामरद, घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत येथील गाईडस व छोटे-मोठे घरगुती हॉटेलचालक रोजगार बुडाल्याने अडचणीत आले होते.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना प्रशासनाकडून भंडारदऱ्यात पर्यटनावर येण्यास शनिवार व रविवारी विकेन्डला वन विभागाने बंदी घातली होती.
आदिवासी भागातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी परिसरातून रोजगार उपलब्ध नसल्याने अकोले तालुक्यातून पर्यटनावरील बंदी मागे घेऊन पर्यटन खुले करावे, अशी मागणी भंडारदरा परिसरातील लोकांनी वन्यजीव विभागाकडे केली होती.
वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील गावचे सरपंच पोलिस पाटील वन कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी, व्यावसायिकांची आज बैठक घेऊन पर्यटन खुले करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वन्यजीव विभागाचे सहाय्य क वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम