Government Job : 10वी पास उमेदवारांना 46 हजारापर्यंत कमवण्याची संधी; इथे सुरु आहे भरती !

Ahmednagarlive24
Published:

Shipai Bharti 2023 Maharashtra : जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी अमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/ कोकण / पुणे विभागात चांगली संधी चालून आली आहे. या राज्यात शिपाई (गट-ड) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

या भरती अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे. राज्यातील अमरावती/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/ कोकण / पुणे विभागातील शिपाई (गट-ड) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेले उमेदवार देखील वरील पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. चला या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.

भरती विभाग

वरील भरती नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाअंतर्गत होत आहे.

पदाचे नाव

या भरती अंतर्गत शिपाई (Peon) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

भरती ठिकाण

ही भरती पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये होत आहे.

भरती श्रेणी

ही भरती राज्य सरकार (State Government) व्दारे केली जाणार आहे.

भरती प्रकार

10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 ते 47,600 पर्यंत वेतन मिळेल.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे तर 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धत

वरील भरती साठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने मागवले जात आहेत.

अर्ज शुल्क

अराखीव प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर राखीव प्रप्रवर्गासाठी 900/- रुपये इतके शुल्क आकारले जाईल.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे.

असा करा अर्ज

-वरील भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
-वरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या लिंकवर  क्लिक करा.
-भरतीचा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची पद्धत, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाथी कर्तव्ये जबाबदाऱ्या इ. माहिती जाणून घेण्यासाठी www.urban.maharashtra.gov.in, www.dtp.maharashtra.gov.in http://ese.mah.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोंबर 2023 आहे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe