Government Scheme: देशात केंद्र आणि राज्य सरकारमार्फत लोकांच्या आर्थिक हितासाठी अनेक योजना सुरु आहे. या योजनांचा आतापर्यंत अनेकांनी मोठा फायदा घेतला आहे तर आता देखील खूप या विविध योजनांचा आर्थिक लाभ घेत आहे.
आम्ही देखील तुम्हाला आज अशीच एक सरकारी योजना सांगणार आहोत ज्याचा तुम्ही फायदा घेत तब्बल अडीच लाख रुपये कमवू शकतात. चला तर जाणून घ्या या जबरदस्त योजनेबद्दल संपूर्ण माहिती. आम्ही येथे तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनाबद्दल माहिती देत आहोत.


तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो ही योजना केंद्र सरकारमार्फत चालवली जात आहे. या योजनेमध्ये कोणत्याही जातीतील स्त्री/पुरुषाशी लग्न करण्यासाठी जोडप्याला 2.5 लाख रुपये दिले जातात. उदाहरणार्थ, जर एखाद्या सामान्य श्रेणीतील व्यक्तीने दुसऱ्या समुदायात लग्न केले, तर त्याला सरकारकडून एक निश्चित रक्कम दिली जाते, जी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असते.
या योजनेचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा एखादा संपन्न हिंदू व्यक्ती आणि अनुसूचित जातीमध्ये विवाह होतो. ज्यासाठी हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत एका वर्षाच्या आत नोंदणी करणे देखील बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

असा मिळणार फायदा
या योजनेंतर्गत शासनाने निश्चित केलेली रक्कम मिळविण्यासाठी परिसरातील आमदार, खासदार यांच्याकडे जावे लागते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अर्ज भरून राज्य सरकार किंवा जिल्हा कार्यालयात पाठवू शकता. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही चुकीची माहिती देणे टाळा. तपासादरम्यान तुमची चूक आढळल्यास तुम्हाला दंडही होऊ शकतो.
हे पण वाचा :- Electronic Devices : सावधान ! तुमच्या घरी ‘ही’ 5 उपकरणे आहेत का? असेल तर होणार मोठा नुकसान ; पहा संपूर्ण लिस्ट













