Government Scheme : आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून तुम्ही देखील सरकारच्या मार्फत सुरु असलेल्या विविध योजनांपैकी एका योजनेत गुतंवणूकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका सुपरहीट योजनेची माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणत फायदा होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आता पर्यंत लाखो लोकांनी या योजनेचा लाभ प्राप्त केला आहे तर अनेक जण सध्या देखील या योजनेतून फायदा करू घेत आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेचे काही जबरदस्त फायदे.
केंद्र सरकारने ही योजना 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेचा नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) हे आहे. तुम्हाला या योजनेत 436 रुपयांच्या वार्षिक पेमेंटसाठी दोन लाखांचा विमा दिला जातो. PMJJBY मध्ये, विमाधारकास 2 लाख रुपयांचे संपूर्ण विमा संरक्षण मिळते. म्हणजेच या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तीचा आजार, अपघात आणि इतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत दिली जाईल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मुदत विमा योजना आहे. त्याचा लाभ मृत्यूनंतरच मिळतो. या योजनेची मुदत पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला काहीही झाले नाही, तर त्याला/तिला लाभ दिला जात नाही. 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती PMJJBY चे लाभ घेऊ शकते. या योजनेत नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑटो डेबिटची सुविधा मिळवू शकता.
PMJJBY प्रीमियम
सरकारने यावर्षी PMJJBY चा प्रीमियम वाढवून 436 रुपये केला आहे. 2015 मध्ये योजना सुरू झाल्यापासून, सात वर्षांपर्यंत प्रीमियममध्ये कोणताही बदल झालेला नाही. या पॉलिसी अंतर्गत भरलेला प्रीमियम पुढील वर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत वैध आहे.
PMJJBY चा लाभ कसा घ्यावा?
जर तुम्हाला PMJJBY मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही कोणत्याही बँक किंवा LIC मध्ये जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून अर्ज करता येतो.
हे पण वाचा :- Youtuber अरमान मलिकच्या दोन बायका एकाच वेळी प्रेग्नेंट कशा झाल्या? ट्रोलिंगनंतर समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती