अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोना लस घेण्यासाठी यापुढे कोणतीही खटपट करण्याची आता गरज नाही कारण आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हा एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, आता 18 ते 44 वयोगटातील लोकं ऑनलाईन रजिस्ट्रेशन शिवाय कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्राला भेट देऊ लस घेऊ शकतात. याची सुरूवात 24 मे पासून झाली आहे.
मंत्रालयाच्या या निर्णयामुळे तरुणांचे मोठे टेन्शन कमी झाले आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांप्रमाणे आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना देखील स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही.
तुम्हाला तुमचा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट किंवा रेशन कार्ड सोबत आणावे लागेल आणि त्याची कॉपीसुद्धा ठेवावी लागेल. यासह, तुमचा मोबाईल देखील तुम्हाला हातात ठेवावा लागेल कारण, तुमच्या मोबाईल नंबरची आवश्यकता स्पॉट नोंदणीच्या वेळी लागते.
त्यावर तुम्हाला संबंधित मॅसेज मिळणार. केवळ लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारीच तुमची नोंदणी करतील आणि उपलब्धतेनुसार ही लस देतील.
नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील? :- आधार कार्ड,मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेला पासबुक, Central केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक क्षेत्र मर्यादित कंपन्यांनी जारी केलेले आयकार्ड.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम