अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- छावणी परिषदेच्या व्हेईकल एंट्री टॅक्सचा ठेका घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून भारत सरकारची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्त्वाखाली छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शने करून सीईओ विद्याधर पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

दरम्यान पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, टेंडर झाल्यानंतर ताबा घेण्याची मुदत १५ दिवसांची असते. मात्र, संबंधित ठेकेदाराने टेंडर ताबा झाल्यानंतर ६० ते ६५ दिवसांनंतर याचा ताबा देण्यात आला. यामुळे कँन्टोन्मेंटचे एक कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. कँटोन्मेंटमधील काम करणाऱ्या कामगारांचे चार महिन्यांचे पगार देण्यात आलेले नाहीत.
तसेच पथकर नाक्यावर मॅनेजर व कर्मचारी यांचे कामावर रूजू झाल्यापासून ते आजपर्यंत पगार करण्यात आलेला नसतानाही त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट का देण्यात आले आहे, असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, राज ठाकूर, महेंद्र उपाध्य, मधुर बागायत, मझर तांबटकर, शानवाज काजी, पाप्या शेख, लियाकत शेख, नईम शेख आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम