अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- स्व.गोविंदराव आदिक यांनी वैयक्तिक फायद्याचे राजकारण न करता सामाजिक विकासाचे राजकारण केले. त्यामुळेच श्रीरामपुरात एसटी कार्यशाळा, टाकळीभान टेलटँक,
अनेक पाझर तलाव, एसटी स्टँड, एमआयडीसी, न्यायालयाची इमारत, विविध प्रशासकीय कार्यालये येऊ शकले.
मात्र, चितळी टेलटँक आणि बीसी नाला या प्रकल्पाचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. माजी मंत्री व माजी खासदार स्व. गोविंदराव आदिक यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध उपक्रम कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी स्व. आदिकांच्या कार्याला उजाळा दिला.
महाराष्ट्र कृषक समाज संघटना व नगरसेवक स्व. सुभाष गांगड मित्र मंडळाच्या वतीने कांदा मार्केट चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्याचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच शहरातील दिव्यांगांना रेनकोट, प्रतिकारशक्ती वाढवण्याची औषधे, मास्क सॅनिटायझर इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष तथा कृषक समाज संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक, युवा नेते अद्वैत आदिक, पत्रकार बाळासाहेब आगे,
पद्माकर शिंपी, अनिल पांडे, प्रदीप आहेर, ज्ञानेश गवले, शिवाजी पवार, गोविंद साळुंखे, प्रवीण जमदाडे, जयेश सावंत यांच्या हस्ते चौक सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम