Grah Gochar April 2023 : या महिन्यात बरेच मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार असून मेष राशीत राहु आणि गुरुच्या युती होत असल्याने गुरु चांडाळ योग तयार होणार आहे. त्यामुळे काही शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होईल. याचा फटका काही राशीच्या लोकांना होणार आहे.
त्यांना येत्या काळात नाहक त्रास सहन करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. याचा परिणाम कोणत्या राशींच्या लोकांना भोगावा लागणार जाणून घ्या.
सिंह रास
या महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या राशीच्या लोकांचे शत्रू त्यांचा गैरफायदा घेतील. इतकेच नाही तर या काळात तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याने अनावश्यक खर्चाला आळा घाला. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या काळात विचारपूर्वक व्यवसायात गुंतवणूक करा.
तयार होतोय मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे गुरु चांडाळ योग
तूळ रास
या महिन्यात तयार होत असणारे योग तूळ राशीच्या लोकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतील. या राशीच्या लोकांना या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच कुटुंबात काही तेढ निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास घरात त्रास होण्याची शक्यता आहे, नाते तुटण्याच्या टोकाला जाऊ शकते. त्यामुळे सर्व विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांना हा योग संमिश्र परिणाम देऊ शकतो. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शक्य असेल तर कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. इतकेच नाही तर या योगामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात.