अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्या कडे जात असणार्या स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चार ट्रक पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतल्या आहेत.
सध्या करोनामुळे आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी या ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चार ट्रक पकडल्या आहेत.ट्रक चालकांच्या संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत,
तसेच या ट्रकचे क्रमांक एम एच 17 ऐवजी मुंबई पासिंग आहेत. राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार,
हेड कॉन्स्टेबल देविदास भडकवार यांनी या चारही ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तपशील दिला आहे.
दरम्यान माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन या घटने बद्दल चिंता व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत तहसीलदार कांबळे यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|