अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- नगर तालुक्यातील घोसपुरी येथील ग्रामसेविका चितळे जयश्री एकनाथ यांना गावातील व्यक्तींनी अमानुष मारहाण केलेली असून या मारहाणीचा ग्रामसेवक संघटना डीएनएई १३६, ग्रामसेवक संघ नगर, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना यांनी जाहीर निषेध केला आहे.
याबाबत पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन धाडगे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत सर्व ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी नगर तालुका पंचायत समितीयेथे होणाऱ्या सभेवर सामुहिक बहिष्कार टाकतील.तसेच ग्रामपंचायतीचे कोणतेही कामकाज करणार नाहीत असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी ग्रामसेवक संघटना डीएनई १३६ चे अध्यक्ष शहाजी नरसाळे, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सूर्यभान सौदागर, ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष अशोक जगदाळे, दीपा राजळे, अंजुम शेख,
कारखिले, मनिषा सुडके, कविता आडेप, विलास शेळके, ज्ञानेश्वर आडसुरे, पोपट रासकर, मंगेश पुंड, भास्कर सिनारे, शरद पिंपळे, अशोक बोरूडे, अरविंद शेळके आदी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम