Environment Department Bharti 2023 : महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण विभागामध्ये नोकरीची उत्तम संधी, 30 हजारापर्यंत मिळेल पगार !

Published on -

Environment Department Bharti 2023 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व्दारे सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई अंतर्गत दैनंदिन कामकाजासाठी लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवली जात आहेत. या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवट पर्यंत वाचा.

भरती संबंधित अधिक माहिती : –

भरती विभाग

ही भरती पर्यावरण व वातावरणीय बदल विभागा अंतर्गत होत आहे.

पदांची नावे

वरील भरती अंतर्गत टंकलेखक, लघुलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data entry Operator), लेखापाल विधी अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, कोस्टल समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

रिक्त जागा

या भरती अंतर्गत एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

भरती विभाग

महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे. निवड झाल्यावर उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

ई- मेल

ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे सादर करायचे आहे.

निवड कालावधी

लक्षात घ्या कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची निवड तात्पुरत्या कालावधीसाठी केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 30,000 रुपये इतके वेतन मिळेल.

भरती जाहिरात

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe