महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोरील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला,

अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शहर जिल्हा सहसचिव ॲड. सुरेश सोरटे आदींसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय घटनेचे निर्मितीतील योगदान अतुलनीय आहे.

देशातील विविध जाती-धर्माच्या करोडो लोकांना एकत्र बांधणारी राज्यघटना आंबेडकर यांनी देशाला दिली. शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे म्हणाले की, भारत हा अठरापगड जातींचा देश आहे.

विविध धर्मांचे लोक या देशात गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. असे असताना देखील केवळ सर्वसमावेशक राज्य घटनेमुळे हा देश एका समान धाग्यात बांधण्याची किमया आंबेडकरांनी केली आहे.

विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. गेली अनेक दशकं ही लोकशाही यशस्वीरित्या या देशामध्ये नांदत आहे.

जगातील सर्व देशांच्या घटनांचा अभ्यास करत भारताच्या राज्यघटनेचा मसुदा डॉ.आंबेडकर यांनी तयार केला होता. म्हणूनच आज भारत प्रगल्भ लोकशाही देश म्हणून जगात ओळखला जातो.

अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख म्हणाले की, डॉ.आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम पाहिले. डॉ.आंबेडकर हे काँग्रेस पक्षाचे नेते होते ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.

सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान म्हणाल्या की, राज्यघटनेने महिलांना समानतेचा अधिकार दिला. महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. शहर जिल्हा सहसचिव ॲड. सुरेश सोरटे म्हणाले की, सध्या देशामध्ये घटनेची पायमल्ली सुरू आहे.

ती रोखण्यासाठी काँग्रेसची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. ख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, शहर जिल्हा सहसचिव ॲड. सुरेश सोरटे आदी.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe