केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्ता तसेच घरभाडे भत्ता इत्यादी बाबत अनेक प्रकारच्या मागण्या असतात. त्या अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात जानेवारी महिन्यापासून चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता अर्थात एचआरए देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे.
याच अनुषंगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणे गरजेचे होते व संबंधीची मागणी देखील करण्यात येत होती. त्यामुळे आता 30 जून 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला व या निर्णयानुसार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
राज्य शासनाच्या सेवेमध्ये जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज असून सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 1 जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू करण्यात आलेली आहे.
त्यामुळे पाच महिन्याच्या थकबाकी सह जून महिन्याच्या पगारापासून ही वाढ देण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारी अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चा विचार केला तर तो 38% इतका मिळतो. आता त्यामध्ये सरकारने चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे तो 42 टक्के करण्यात आलेला आहे.
एक जानेवारी 2023 पासून ही महागाई भत्त्यातील वाढ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच महिन्याची थकबाकी देखील मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यासंबंधीचा शासन आदेश वित्त विभागाने शुक्रवारी लागू केला आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा आता राज्यातील 17 लाख शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.