अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज (दि. 29 मार्च) नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली असल्याने पालकमंत्री येत आहेत.
सोमवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर येथून खाजगी विमानाने ते शिर्डीला येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता शिर्डी विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. शिर्डी येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगरकडे येतील.
दुपारी 12 वाजता कोरोना लसीकरण, सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता
अहमदनगर जिल्हयातील यापूर्वी व सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतक-यांना मिळणा-या शासकीय मदतीबाबात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा पार पडणार आहे.
दुपारी 1.30 पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 2 वाजता राखीव स्थळ- शासकीय विश्रामगृह, अहमदनगर.
दुपारी 3 वाजता पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा. स्थळ- शासकीय विश्रामगृह, अहमदनगर. दुपारी 3.30 वाजता अहमदनगर येथून शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून मुंबईकडे प्रयाण करणार.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|