अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- गुजरात येथील व्यापार्याला तब्बल 31 लाख रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या व्यापार्याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रक मध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजण घेऊन येत होते.
ट्रक मधील तेलाचे डबे पुणे येथील एका व्यापार्याला पोहोच करावयाचे होते. ट्रकमध्ये 27 लाख 53 हजार 939 रुपये किमतीचे 1090 सोया ऑईल तेलाचे डबे, एका डब्यात 15 लिटर तेल,
2 लाख 52 हजार 632 रुपये किंमतीचे 200 डबे, प्रत्येक डब्यात 1 लिटर सोया ऑइल चे पाऊच असे एका डब्यात 10 पाऊच असा एकूण 30 लाख 6 हजार 571 रुपयांचा माल होता.
हा माल ठरल्याप्रमाणे बसंत ट्रेडिंग पुणे येथे पाठविणे गरजेचे असतानाही याठिकाणी माल पाठवण्यात आला नव्हता.
आपल्या मालाचा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी अशोक कुमार रामनिवास चौधरी (रा. सुरत, राज्य गुजरात) यांनी याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन संगमनेरच्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम