गुरु अर्जुन देवजी यांनी धर्म व सत्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली -आमदार संग्राम जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- धर्मासाठी बलिदान देणारे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिद दिवसानिमित्त जी.एन.डी. (गुरुनानक देवजी) सेवा ग्रुपच्या वतीने तारकपूर येथे नागरिकांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सरबत व प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राज गुलाटी, संजय आहुजा, मनिष खुराणा, दिनेश बत्रा, अ‍ॅड. तांदळे, गुरमीत कथुरिया, अनिश आहुजा, सतीश गंभीर, जतीन आहुजा, मनोज मदान, बिट्टू मनोचा, ठाकूर नवलानी, जय रंगलानी, हॅपी कुकरेजा, प्रितपालसिंग धुप्पड,

अवतार गुरली, मनोज मनोचा, गुरमेहेर खुराणा, किशोर कंत्रोड, करण आहुजा, रोहित बत्रा आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शीख समाजाचे पाचवे गुरु अर्जुन देवजी अन्याय, अत्याचारापुढे झुकले नाही.

त्यांनी धर्म व सत्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. वीर योध्दा असलेले अर्जुन देवजी यांनी धर्मासाठी त्यागाची शिकवण दिली. जी आजही समाजासाठी दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

जनक आहुजा यांनी गुरु अर्जुन देवजी यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe