अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे गुरुजी विद्यार्थ्यांना आयुष्याची वाट दाखवत असतात. मात्र शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणाऱ्या एका गुरुजींनी होणाऱ्या बदलीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले.
फेसबुकवर बदलीत झालेल्या अन्यायाला कंटाळून मी आता आत्महत्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे, अशी भावनिक पोस्ट टाकली आणि एकच खळबळ उडाली.

घराच्या मंडळींनी पोलीस स्टेशन गाठले आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे गुरूजींना शेजारच्या तालुक्यातून ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या गुरूजींची 2018-19 मध्ये बदली झाली. ही बदली चुकीची असल्याचा गुरूजींचा आक्षेप आहे.
या बदली विरोधात गुरूजींनी प्रशासनाकडे दादही मागितली. पण उपयोग झाला नाही. यामुळे गुरूजींनी टोकाचे पाऊल उचलत न्याय मिळत
नसल्याने आत्महत्याच्या निर्णयापर्यंत आल्याची फेसबुकवर पोस्ट टाकली आणि एकच खळबळ उडाली. गुरुजींच्या घरच्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले.
त्याठिकाणी गुरूजींची मिसिंगची तक्रार नोंदविण्यात आली. गुरूजींचा मोबाईल सुरू होताच त्यांचे लोकेशन शेजारच्या तालुक्यात सापडले. पोलीसांनी तात्काळ गुरूजींचा ठावठिकाणा शोधून त्यांना ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













