अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने झेडपीतील माध्यमिक शिक्षक विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वेतन पथक कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा अन्यथा दर फलक कार्यालयाबाहेर लावण्याची उपरोधक मागणी शिक्षकांनी केली. या आंदोलनास आ. डॉ. सुधीर तांबे यांनी भेट देऊन जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आंदोलनास पाठिंबा दिला.
आंदोलनप्रसंगी उपस्थित असलेले आ.डॉ. तांबे म्हणाले की, शिक्षक कार्यालयाबाहेर उभे राहून छातीठोकपणे कशा पध्दतीने भ्रष्टाचार सुरु असल्याचे उदाहरणासह सांगत असून ही गंभीर बाब आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची पैश्यासाठी साध्या कामांमध्ये अडवणुक केली जाते, हे निषेधार्ह बाब आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक यांना या संदर्भात जाब त्यांनी विचारला. शिक्षणाधिकारी हराळ यांनी विविध कामासाठी शिक्षकांनी घेऊन आलेले कागदपत्रे कार्यालयातील क्लार्कला न भेटता त्यांच्या दालनात इनवर्ड करण्याचे सूचना केल्या.
या पध्दतीने सर्व कागद पत्राची पुर्तता करुन शिक्षकांची कामे न झाल्यास याला स्वत: जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेतन अधिक्षक हवेले यांनी देखील मार्च महिन्यापासून अनुदान कमी येत असल्याने निम्मे-निम्मे शाळांचे बील अदा केले जात आहे.
यामुळे वेतन मिळण्यास उशीर होत असल्याचे स्पष्ट केले. शिक्षकांनी इतर जिल्ह्यात अनुदान पुर्ण येत असून, अहमदनगर जिल्ह्यात कमी का येत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार यांनी मंत्रालय स्तरावर अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचा नियमित वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम