अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत विषय मंजुरीवरून वाद निर्माण झाला.
यावेळी आक्रमक विरोधकांनी थेट ऑनलाईन सभेत येऊन संचालक मंडळाला धारेवर धरले. दरम्यान जिल्हा प्राथमिक बँकेची सभा अध्यक्ष राजू राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत विषय मंजुरीवरून वादंग सुरु झाले. दुपारी बाराला सुरु झाले होते. यावेळी विकास डावखरे, प्रविण ठुबे यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. यावेळी संचालक सलीमखान पठाण व विद्युलता आढाव यांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला.
विरोधकाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय विषयांना मंजूरी देवू नका अशी मागणी करत विरोधकांनी करत गोंधळ घातला.विरोधक थेट बँकेच्या सभागृहात घुसल्याने पोलिसांनी शिक्षकांना सभागृहाबाहेर काढले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|