अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरु आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून या अवैध व्यवसाय करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.
नुकतेच संगमनेरात पुन्हा एकदा गुटखा जप्तीची कारवी करण्यात आली आहे. गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन अडवून पोलिसांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील सायखिंडी फाटा परिसरात करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सायखिंडी फाटा परिसरात लोगन कंपनीची कार (क्रमांक एमएच ०४ ईडी ७२८३) मधून गुटख्याची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी चौकशी केली असता या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करुन ३८ हजार १६० रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याची ३१८ पाकिटं, ९ हजार ५४० रुपये किंमतीची रॉयल ७१७ तंबाखुची ३१८ पाकिटं व साडेपाच लाख रुपये किंमतीची कार जप्त केली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सचिन धनवटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अफ्रोज रफिक शेख (वय २६), कैफ अन्वरखान पठान (वय २६, दोघेही रा. नायकवाडपुरा), रितेश सुभाषचद्र गादीया (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन करत आहेत.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved