अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राहुरी येथील पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील यश ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतात पाटाचे पाणि शिरत असल्याने त्याचे शेत पडीक राहत आहे.
पाटबंधारे विभागाच्या या अनागोंधी कारभाराला वैतागून यश ढोकणे हा शेतकरी आपल्या कुटूंबासह आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे. यश अशोक ढोकणे या शेतकऱ्याची राहुरी तालुक्यातील उंबरे येथे गट नंबर ७९ मध्ये ८३ आर शेतजमिन आहे.
या शेजमिनीला खेटून पाट गेला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून पाटाचे पाणि यश ढोकणे याच्या शेतजमिनीत साठत आहे. त्यामुळे ती जमिन पडिक राहत आहे. परिणामी ढोकणे कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत यश ढोकणे या शेतकऱ्याने पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. पाटबंधारे विभागाने नूकसान भरपाई म्हणून एक वर्षाला दोन लाख रूपये प्रमाणे २५ वर्षाचे ५० लाख रूपये द्यावे.
तसेच सदर पाटपाण्याची योग्य ती व्यवस्था करावी. असा अर्ज ढोकणे यांनी संबंधित पाट बंधारे विभागाकडे दिला आहे.
त्यांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाहीतर यश अशोक ढोकणे हे त्यांच्या कुटुंबासह कोणत्याही क्षणी राहुरी येथील सिंचन शाखा क्रमांक एक समोर आत्मदहन करतील. असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|