अरणगाव रस्त्याचे अर्धवट सोडलेले काम सुरु मनसेच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव रोडचे अर्धवट राहिलेले काम अनेक दिवसापासून रखडले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेल्वे ब्रिज आणि सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीसंदर्भात अनेकवेळा आंदोलने, निवेदन आणि पाठपुरावा करण्यात आला होता.

मनसेच्या पाठिंब्याला अखेर यश आले असून, या रोडचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या कामाची पहाणी केली.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अरणगाव शाखा अध्यक्ष राहुल फुलारे, उपाध्यक्ष सागर उदमले, अनिकेत जाधव, शुभम साबळे, मोहन जाधव, प्रकाश जाधव, श्रीकांत फुलारे परशुराम फुलारे, मंगेश जाधव, वैभव पवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव रोडचे अर्धवट राहिल्याने सदर रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत होते. तर काही अपघातामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. स्थानिक नागरिकांना देखील या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

या रस्त्याचे काम होण्यासाठी मनसेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन वेळप्रसंगी खड्डयात रोपे लावून, तर ठिय्या मांडून आंदोलने करण्यात आली.

या पाठपुराव्याला आखेर यश आले असून, रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी या पुलाच्या आणि पुलाशेजारील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. ज्या कंपनीने हे काम सुरु केले,

त्यांचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आभार मानले. सदर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात, मनसेने रास्ता-रोको करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे अनिकेत जाधव यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe