अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- संगमनेर माडझिला इस्लामपुरा नाटकी चौक येथे वाढदिवसाच्या कारणावरून दोन गटात शाब्दीक बाचाबाची होवून तुंबळ हाणामारी झाली.
या मारहाणीत सहा जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील इस्लामपुरा नाटकी चौक येथे वाढदिवस साजरा करण्यात येत होता. त्यावेळी मोठमोठ्याने आरडाओरड करुन
हा वाढदिवस साजरा होत असतांना अमजद दाऊद सय्यद (वय 41) हे व त्यांचा मुलगा सोहेल व नातेवाईक हे समजावून सांगण्यात गेले असता
तेथे जमीर शेख ऊर्फ पिंट्या अजिज शेख, फैजान समीर शेख, अदनान समी शेख, निसार शेख, मुन्ना शेख, गुड्डु निसार सेख, असिम शेख, अरबाज शेख, तस्लिम शेख, बत्रु शेख यांनी हातात लोखंडी रॉड हॉकीस्टीक,
लाकडी दांडे घेवून अमजद दाऊद सय्यद व त्यांचा मुलगा सोहेल व इतर नातेवाईकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अमजद दाऊद सय्यद, इब्राम दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, सोहेल अमजद सय्यद हे गंभीर जखमी झाले असून
त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अमजद दाऊद सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
तर परस्पर विरोधी फिर्यादीमध्ये शहेराज निसार शेख, अरबाज निसार शेख, अदनान समिर शेख, फैजान समिर शेख हे लोकसेवा गॅरेज समोर वाढदिवसानिमित्त केक कापत असतांना साहिल अमजद सय्यद,
मजाज दाऊद सय्यद, अमजद दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, बब्बु दाऊद सय्यद, समीर अन्सार सय्यद, इरफान दाऊद सय्यद, परविन अमजद सय्यद, रुक्तार मजाज सय्यद (सर्व रा. इस्लामपुरा, संगमनेर)
यांनी सदर ठिकाणी येवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात वरील 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम