बर्थडे भोवला ! मनपा आरोग्य अधिकारी सक्तीच्या रजेवर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लॉकडाऊन मध्ये बर्थडे साजरा करणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच भोवले आहे.

बोरगे यांना मनपा आयुक्तांनी अखेर सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. बोरगे गेले अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरत होते. यातच कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी असताना डाॅ. बोरगे हे अनेक बाबीत अपयशी ठरले.

तसेच कोविड रुग्णालयांना परवानगी देताना नियमांचे पालन केले नाही यासह १७ प्रकारचे गंभीर ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

यामुळे त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची गर्दी जमवून आपल्या दालनात व निवासस्थानी बोरगे गाणे गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी समाजातून संताप व्यक्त झाला. बोरगे यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती.

परंतु, त्यांनी मुदतीत खुलासा केला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही बोरगे यांच्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत्या.

त्यांनी बोरगे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश मनपा आयुक्तांना दिला असल्याचे समजते. आयुक्तांनी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल मागविला होता.

त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधानांच्या व्हिडीओ काॅन्फरन्स बैठकीलाच अनुपस्थितीत राहिल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यावरही कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आरोग्य विभागाला पाठविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe