अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे महिलांच्या अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच अधिक एका घटना जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडली आहे.
पारनेर तालुक्यात 19 वर्षीय विवाहिता एकटी असताना घरात प्रवेश करून ‘तू मला आवडते‘ असे म्हणत विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुभाष जालिंदर सुंबे (रा. गोरेगाव पाडळी, ता. पारनेर) याने विवाहित तरुणी तिच्या घरात एकटी असताना तू जर तुझ्या नवर्याला सांगितले तर तुला व तुझ्या नवर्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. एस. के. कदम करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved