अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती.
या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे.

दरम्यान गहू सोंगणीसाठी लागणारे हार्वेस्टर हरियाणा आणि पंजाब या परप्रांतातून येत असतात. मात्र स्थानिक युवकांनी त्यांची मक्तेदारी मोडून काढत हार्वेस्टरने व्यवसायाला सुरुवात करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती केली आहे.
मनमानी भाव व हंगाम संपत आल्यानंतर गहू तसाच टाकून आपल्या प्रांतात गहू काढण्यासाठी निघून जात असल्यामुळे लेट पेरणी केलेले गहू काढण्यासाठी शेतकर्यांना जादा पैसे मोजावे लागत होते.
मात्र चासनळी परिसरात युवकांनी एकत्र येत हार्वेस्टरचा नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे स्थानिक शेतकरी त्यांना पसंती देत आहे. कांद्याची रोपे नसल्यामुळे यावर्षी गव्हाचे क्षेत्र जास्त प्रमाणात वाढले असून
स्थानिक युवकांनी शेतीला जोडधंदा म्हणून गहू सोंगणीचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या गहू सोंगणीला वेग आला असून डिझेलचे दर वाढूनही मागील वर्षी इतकाच भाव असल्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













