अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी रात्री झोपेत असताना पतीने हे कृत्य केल्याचे समोर समोर आले आहे.
मावळ तालुक्यातील चंदनवाडी – चांदखेड येथे घडली आहे. चांगुणा योगेश जाधव (वय २०, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

शवाजी दामू ठाकर (वय ४३, रा. ठाकरवाडी, परंदवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती योगेश कैलास जाधव (वय २६) याला अटक केली आहे.
चांगुणा आणि आरोपी योगेश हे पती-पत्नी असून ते चंदनवाडी येथे राहत होते. चांगुणा हिला पहिली मुलगी झाली. या कारणावरून योगेशने तिचा वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला.
घटनेच्या दिवशी चांगुणा झोपी गेली. चांगुणा झोपेत असतानाच योगेश याने गळा आवळून खून केला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. पोलिसांनी योगेशला अटक केली आहे. तळेगाव – दाभाडे पोलिस तपास करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम