मिरची पूड टाकून ५५ हजार रुपये लांबवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  पेट्रोल पंपावरील कर्मचारी बँकेत भरणा करण्यासाठी घेवून जात असलेले ५५ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून लांबवले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरसगाव शिवारातील अशोक दूध डेअरी व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी दीपक देवरे (वय ३९)

हे श्रीरामपूर येथे भरण्याची रक्कम घेवून जात असताना अज्ञात व्यक्तीने देवरे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडे असलेले ५५ हजार ३०० रुपये लांबवले.

घटनेची माहिती मिळताच निरीक्षक संजय सानप हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची चौकशी करुन आरोपींचा शोध घेऊ असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News