अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीन सुमोर दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगार देत फरार झाला होता. त्याच्यावर श्रीगोंदा, शिरुर ,दौंड व सासवड या चार पोलिस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपो गुन्हे दाखल होते.
मात्र या फरार आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी मोठ्या शिताफीने कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात जेरबंद केले आहे. लल्या हरदास भोसला असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील नाजुका भोसले या महिलेने लल्या भोसला याच्याविरूध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर श्रीगोंद्यासह शिरुर, दौंड व सासवड या पोलिस ठाण्यात देखील वेगवेगळे गुन्ह्यांसह मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
दरम्यान संबंधित आरोपी हा कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात आला असल्याची माहिती गुप्तबातमीदाराने पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कुळधरण शिवारात कोम्बिंग ऑपरेशन राबवून लल्या भोसला याला जेरबंद केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम